कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानाने हिंदु युवतीचे मदरशामध्ये धर्मांतर करून केला निकाह !

कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून युवतीचा शोध !

मंझनपूर (उत्तरप्रदेश) – कौशांबी जिल्ह्यातील सराय अकिल गावात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. २७ जून या दिवशी एका मुसलमानाने एका हिंदु युवतीचे अपहरण केले. युवतीच्या कुटुंबियांना ती बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. कुटुंबियांना मुलीचे अपहरण एका मुसलमानाने केल्याचे कळल्यावर शेकडो हिंदूंनी २९ जून या दिवशी पोलीस ठाण्याला घेराव घालून पोलिसांकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांना मुलीला शोधण्यात यश आले असून त्यांनी तिला तिच्या घरी पोचवले आहे. पुढील तपास चालू आहे.

सदर युवती ही एका नातेवाइकाच्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली. त्यानंतर तिला मुसलमानाने प्रयागराजच्या करेली येथील एका मदरशात नेले आणि तिचे धर्मांतर केले. नंतर तिच्याशी निकाह (इस्लामी पद्धतीने विवाह) केला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पीडितेच्या वडिलांनी म्हटले की, धर्मांतर करण्याआधी प्रशासनाला प्रार्थनापत्र द्यावे लागते; परंतु या प्रकरणात तसे करण्यात आलेले नाही. उत्तरप्रदेश राज्यात धर्मांतरविरोधी, तसेच लव्ह जिहादविरोधी कायदे आहेत.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेश राज्यात लव्ह जिहादविरोधी, तसेच धर्मांतरविरोधी कायदे अस्तित्वात असतांनाही हिंदूंच्या संदर्भात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! राज्यशासनाने केवळ कायदे करून थांबू नये, तर प्रशासकीय अधिकार्‍यांकडून त्यांची प्रभावी कार्यवाही होत आहे ना, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे !