जम्मू-काश्मीरमधील ‘जी-२०’ देशांच्या समुहाच्या बैठकीच्या आयोजनावर पाकची टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – यावर्षी भारताकडे ‘जी-२०’ देशांच्या समुहाचे अध्यक्षपद आल्यानंतर जम्मू-काश्मीर येथे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावरून पाकने गरळओक केली आहे.

पाकच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त वादग्रस्त क्षेत्र आहे. वर्ष १९४७ पासून काश्मीरवर भारताने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक) तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये ६३९ निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जी-२० समुहाची बैठक आयोजित करणे, हा एक विनोद आहे. त्याला आंतरराष्ट्रीय समुदाय कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही.

संपादकीय भूमिका

पाकने आता जम्मू-काश्मीरच्या संदर्भात बोलण्याऐवजी त्याच्या देशातील आर्थिक दिवाळखोरीकडे लक्ष द्यावे, असे भारताने ठणकावून सांगितले पाहिजे !