स्थिरता, तत्त्वनिष्ठता आणि साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारी गोवा येथील कु. अनुराधा जाधव !

कु. अनुराधा जाधव

सौ. दीपा श्रीहरि मामलेदार यांना सहसाधिका कु. अनुराधा नंदकुमार जाधव यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. स्थिरता

कु. अनुराधाताई सत्संगात दृष्टीकोन देते, त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवच (परात्पर गुरु डॉ. आठवलेच) बोलत आहेत’, असे वाटून ‘ते ऐकत रहावे’, असे मला वाटते. तिच्या बोलण्यात स्थिरता असते. तिच्या आवाजात कधीच चढ-उतार नसतो. ती शेवटपर्यंत एकाच लयीत बोलते.

२. तिच्याकडून आम्हाला सेवा करायला प्रोत्साहन मिळते आणि ती प्रत्येक साधकाला साधनेत पुढे नेण्यास प्रोत्साहन देते.

३. तत्त्वनिष्ठता

ती कोणत्याही साधकाला भावनिक स्तरावर न हाताळता तत्त्वनिष्ठ राहून त्या साधकाच्या चुका सांगते.

सौ. दीपा श्रीहरि मामलेदार

४. कु. अनुराधाताईच्या आवाजातील गोडव्यामुळे ‘ती सांगत असलेले साधनेचे प्रयत्न कृतीत आणूया’, असे वाटून तशी कृती होणे

कु. अनुराधाताईच्या आवाजात गोडवा आहे. ताई आमचा प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा घेते. ती या आढाव्यातून आम्हाला ‘भावजागृतीसाठी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव कसा ठेवायचा ?’, हे सांगते. ती सांगत असतांना तिच्या आवाजातील गोडव्यामुळे ‘ते लगेच कृतीत आणूया’, असे मला वाटते आणि तशी कृतीही होते.

गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हाला अशी गुणी दायित्व असलेली साधिका दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– सौ. दीपा श्रीहरि मामलेदार, फोंडा, गोवा. (१६.१२.२०२१)