मुंबई – शिवसेनेचे नेते, तसेच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. २५ जूनपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या बैठकीला उपस्थित रहाणारे उदय सामंत २६ जूनच्या सकाळपासून उपलब्ध नव्हते.
बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे उदय सामंत हे आठवे मंत्री आहेते. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेमध्ये विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे.