चर्चेत सहभागी मुसलमानाने प्रथम अवमानकारक विधाने केल्याने नूपुर शर्मा यांनी प्रत्युत्तर दिले !

पाकमधील मौलाना (इस्लामी अभ्यासक) इंजीनियर महंमद अली यांच्याकडून नूपुर शर्मा यांचा बचाव !

डावीकडून मौलाना इंजीनियर महंमद अली आणि नुपूर शर्मा

इस्लामाबाद – महंमद पैगंबर यांच्याविषयी (‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी) वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी कथित अवमानकारक विधान केल्याने भारतात, तसेच इस्लामी देशांत त्यांचा विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमधील मौलाना इंजीनियर महंमद अली यांनी नूपुर शर्मा यांचा बचाव केला आहे. तसेच या चर्चासत्रामध्ये शर्मा यांना चिथावणार्‍या तसलीम अहमद रहमानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रहमानी यांनी हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानेच नूपुर शर्मा यांनी त्याला प्रत्युत्तर दिले, असे महंमद अली यांनी सांगितले आहे.

पहिला आरोपी नूपुर शर्मा यांना चिथावणारा !

मौलाना इंजीनियर महंमद अली यांनी म्हटले की, पहिला आरोपी तो आहे ज्याने अन्य धर्मांविषयी वृत्तवाहिनीवरून विधान केले. या वादाच्या पूर्ण वातावरणाला पहावे लागेल. नूपुर शर्मा यांच्या विधानाच्या अंदाजावरून लक्षात येते की, त्या प्रत्युत्तर देत आहेत. नूपुर शर्मा यांनी म्हटले की, जर तुम्ही अशा प्रकारचे विधान कराल, तर आम्हीही तसेच बोलू !

कोणत्याही धर्माची टिंगल करणे कुराणनुसार अयोग्य !

मौलाना इंजीनियर महंमद अली म्हणाले की, कोणत्याही धर्माची टिंगल करणे हे कुराणनुसार अयोग्य आहे. दुसर्‍या धर्माच्या लोकांशी वाद घालतांना नेहमीच भाषेकडे लक्ष ठेवले पाहिजे. नूपुर शर्मा प्रकरणी अरब देशांमधील लोक वातानुकूलित खोलीमध्ये बसून वातावरण बिघडवत आहेत.

अमेरिकेने भारताच्या विरोधात अरब देशांना चिथावले !

मौलाना इंजीनियर महंमद अली यांनी दावा केला की, मुळात हे एक आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणत होते, ‘भारत अमेरिका आणि रशिया या दोघांकडून लाभ घेत आहे.’ आता भारत आणि इम्रान खान यांच्या लक्षात आले असेल की, अमेरिका वाटेल, त्याला झुकवू शकते. अरब देशांचे रशियाशी पटत नाही, ते अमेरिकेचे गुलाम आहेत. अशा अरब देशांना अमेरिकेने नूपुर शर्मा प्रकरणात भारताच्या विरोधात भडकावले. यापूर्वी अशा अनेक मोठ्या घटना घडल्या ज्यामध्ये या अरब देशांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आता रशियाच्या संदर्भात भारतावर दबाव बनवण्यासाठी अमेरिकेने अरब देशांना चिथावले.

संपादकीय भूमिका 

आता हिंदूंनी या चर्चेत सहभागी होऊन हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून तसलीम अहमद रहमानी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !