कुवैतने खजुराच्या उत्पादनाच्या वाढीसाठी खत म्हणून भारताकडून मागवले गायीचे शेण !

इस्लामी देश कुवैतकडून गायीच्या शेणाची मागणी !

नवी देहली – इस्लामी देश कुवैतमधील शास्त्रज्ञांना संशोधनाद्वारे लक्षात आले की, खजुराच्या उत्पादनासाठी खत म्हणून गायीच्या शेणाचा वापर उपयोगी ठरत आहे. त्यानंतर कुवैतने भारताकडून गायीच्या शेणाची मागणी केली.

यावर भारताने कुवैतला १९२ मेट्रिक टन शेण पाठवले आहे. आतापर्यंत भारत कुवैतला दुधाच्या संदर्भातील उत्पादने निर्यात करत होता.

संपादकीय भूमिका

  • ‘गायीचे शेण हे उत्तम खत आहे’, हे भारतियांना सहस्रो वर्षांपासून ठाऊक आहे, ते कुवैतच्या शास्त्रज्ञांच्या आता लक्षात आले, हे गोहत्यांचे समर्थन करणारे, तसेच गोमांस भक्षण करणारे लक्षात घेतील का ?
  • भारत सरकार आता तरी गायींचे महत्त्व जाणून गोहत्या रोखणार का ? तसेच शेणासाठी तरी भाकड गायींचे रक्षण करणार का ?