साधकांसाठी पंचमहाभूतांप्रमाणे विशाल तत्त्व असलेले परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘साधकांना सदासर्वकाळ आधार देणारी धरणीमाता म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर !

२. सर्वांना स्वतःत सामावून घेणारा अथांग प्रीतीचा सागर म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर !

३. साधकांचे स्वभावदोष, अहं आणि त्यांचा आध्यात्मिक त्रास जाळणारे अग्नीतत्त्व म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर !

४. साधकांच्या देहातील पेशीपेशींत सामावणारा प्राणवायू आणि साधकांचा श्वास म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर !

५. स्वभावदोष आणि अहं सहित साधकांना स्वीकारून त्यांना आपलेसे करणारी विशाल आकाशरूपी पोकळी म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर !

साधकांना परम भाग्याने लाभलेल्या परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक