उडुपी (कर्नाटक) – जिल्ह्यातील कुंदापूर येथे शिल्पा देवाडिगा या २५ वर्षीय तरुणीने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केली. शिल्पाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘माझा प्रियकर अझीझ माझे लैंगिक शोषण करून मला मारहाण करत होता.’ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिल्पाच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, अझीझ याने शिल्पाला बलपूर्वक धर्मांतर करण्यास भाग पाडले होते. अझीझने अश्लील व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत होता. जर इस्लाम स्वीकारला नाही, तर व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी त्याने शिल्पाला दिली होती.
Love Jihad in Karnataka: Hindu woman consumes rat poison to end her life after Azeez sexually abused and pressurised her to accept Islamhttps://t.co/d4LoLD0U0v
— OpIndia.com (@OpIndia_com) May 28, 2022
शिल्पा एका कपड्याच्या दुकानात काम करत होती. त्या वेळी तिची ओळख अजीज याच्याशी झाली. तो विवाहित असतांनाही त्याने शिल्पाला विवाहाचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण केले.
संपादकीय भूमिका
|