रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम, संत आणि साधक यांना पाहून श्रीमती पद्मा शेणै यांना स्फुरलेले काव्य !
माझे माहेर भूवैकुंठ रामनाथी ।
माझे वडील आणि आई
गुरुमाऊली अन् सद्गुरुद्वयी (टीप १) ।
माझे माहेर भूवैकुंठ ।। १ ।।
माझ्या बहिणी सुप्रिया अन् वृषाली (टीप २) ।
करितसे साधकांना दोषमुक्त अन् त्यांची गुणवृद्धी ।
माझे माहेर भूवैकुंठ ।। २ ।।
माझे ताई-दादा (संत) अनेक, त्यांची ख्याती काय सांगू ।
त्यांनी गाठले सद्गुरु-संतपद ।
माझे माहेर भूवैकुंठ ।। ३ ।।
जाऊनी गुरुमाऊलीस शरणी ।
अनुभवले विश्वची माझे घर ।
प.पू. गुरुदेव (टीप ३) कोटीशः कृतज्ञता ।। ४ ।।
– श्रीमती पद्मा शेणै (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) (वय ६१ वर्षे), भाग्यनगर (२७.२.२०२२)
टीप १ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
टीप २ – सौ. सुप्रिया माथुर आणि कु. वृषाली कुंभार
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |