भूमीच्या मालकीवरून मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

रीवा (मध्यप्रदेश) येथे सरकारी भूमीवर मंदिर आणि मशीद

घटनास्थळ

रीवा (मध्यप्रदेश) – येथील मनगवां गावामध्ये सरकारी भूमीवर मंदिर आणि मशीद दोन्ही असल्याने दोन्ही धर्मियांकडून या भूमीवर दावा केला जात आहे. यातून झालेल्या वादातून येथे हाणामारी झाल्याची घटना घडली. यात मुसलमानांकडून लवकुश गुप्त यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. ही माहिती मिळाल्यावर तेथे मोठ्या संख्येने हिंदू पोचले. तेथे पुन्हा हाणामारी झाली. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. या हाणामारीत घायाळ झालेल्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यात भाजपच्या माजी नगरसेवकाचाही समावेश आहे.

संपादकीय भूमिका

  • मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर आक्रमण होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
  • सरकारी भूमीवर अशा प्रकारचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन काय करत होते ?