काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

जप्त केलेला शस्त्रसाठा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर पोलिसांनी ३ वेगवेगळ्या कारवाईत  ५ आतंकवाद्यांना अटक करून मोठा शस्त्रसाठा जप्त केला. श्रीनगरमध्ये २, बारामुल्लामध्ये ३ आणि कुपवाडा जिल्ह्यात एका आतंकवाद्याला अटक केली आहे. या सर्वांकडून १५ पिस्तूल, ३० मॅगझिन आणि ३०० काडतुसे जप्त करण्यात आली.

बारामुल्लामध्ये अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यामुळे गोशबुग पट्टण येथील सरपंचाच्या हत्येमागील गूढही उकलले आहे. अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांनी या सरपंचाची हत्या केल्याचे समजते.

संपादकीय भूमिका

आतंकवाद्यांना पाककडून सर्वकाही मिळत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !