जादूटोणाद्वारे पत्नीच्या गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर केली हत्या !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या सहारनपूरमधील एका मशिदीत गर्भवती पत्नीची हत्या करणार्या इमामला पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपी इमाम उस्मान याने गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे. उस्मान याने सांगितले की, त्याची पत्नी हिना ८ मासांची गरोदर होती. त्याला मुलगा हवा होता. त्यामुळे त्याने आपल्या जादूटोणाद्वारे पत्नीच्या गर्भात काय आहे, हे शोधून काढले. तिच्या गर्भात मुलगी असल्याची माहिती मिळाल्यावर त्याने हिनाला गर्भपात करण्यास सांगितले; पण त्यास तिने नकार दिला. त्यानंतर त्याने १२ मे या दिवशी पत्नीला मशिदीच्या छतावरून ढकलून देऊन तिची हत्या केली. मशिदीच्या छतावरून पडल्याने हिनाचा जागीच मृत्यू झाला.
मस्जिद के इमाम ने 8 महीने की गर्भवती बीवी को मार डाला, मस्जिद की छत से दे दिया धक्का: बेटा चाहता था, लेकिन बेटी होने का था शक#Saharanpur #Murderhttps://t.co/CR5lh4cnx8
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 23, 2022
इमाम उस्मान आपल्या मुलीचा खुनी असल्याचे कळताच हिनाच्या आईने सहारनपूर पोलिसांत उस्मान आणि त्याच्या इतर दोन साथीदारांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता इमाम दोषी आढळला, अशी माहिती पोलीस अधिकारी पीयूष दीक्षित यांनी दिली.
संपादकीय भूमिका
|
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
भ्रमणभाषने पालकांची जागा घेणे, ही शोकांतिका ! – Supreme Court
(म्हणे) ‘पंतप्रधानांनी प्रश्नपत्रिका फुटीचे उत्तरदायित्व निश्चित केलेच नाही !’ – Congress
Siliguri Corridor : सिलीगुडी कॉरिडॉर आता ‘चिकन नेक’ राहिलेला नाही, तर ‘एलिफंट्स ट्रंक’ बनला !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !