भाजपचे आमदार अभिजित सिंह सांगा यांची घोषणा !
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील भाजपचे आमदार अभिजित सिंह सांगा यांनी काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या प्रकरणी ट्वीट केले आहे. त्यांनी यात म्हटले आहे, ‘दुर्योधनाने ५ गावे दिली नाहीत, तेव्हा त्याला संपूर्ण राज्य गमवावे लागले होते. आम्ही ३ (अयोध्या, काशी आणि मथुरा) मंदिरे मागितली होती. तुम्ही (मुसलमानांनी) ती दिली नाहीत. आता तुम्ही सिद्ध व्हा, आम्ही सर्व मंदिरे परत घेणार !’ देशातील सहस्रो मंदिरे पाडून तेथे मुसलमान आक्रमकांकडून मशिदी आणि दर्गे बांधण्यात आल्याचा इतिहास आहे. त्या पार्श्वभूमीवर सांगा यांनी हे ट्वीट केले आहे.
Abhijeet Singh Sanga: ‘हमने 3 मंदिर मांगे थे तुमने नहीं दिए, अब सारे वापस लेंगे…’, जानिए कौन हैं विवादित बयान देने वाले बीजेपी MLA सांगाhttps://t.co/MCGTJooJA9
— India TV Hindi (@IndiaTVHindi) May 20, 2022