(म्हणे) ‘सरसंघचालकांच्या बंगाल दौर्‍याच्या वेळी दंगली होऊ नयेत; म्हणून पोलिसांनी सतर्क रहावे !’

कोलकाता (बंगाल) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बंगाल राज्याच्या दौर्‍यावर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना राज्यात दंगली होऊ नयेत, यासाठी सतर्क रहाण्यास सांगितले आहे. रा.स्व. संघाच्या बंगालमध्ये अनुमाने १ सहस्र ८०० शाखा आहेत. त्यांपैकी अनुमाने ४५० शाखा राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आहेत.

बॅनर्जी म्हणाल्या की, सरसंघचालक १७ ते २० मे या काळात केशियारी गावात रहात आहेत. अशा स्थितीत त्यांचे धोरण काय आहे ? याकडे प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. या काळात दंगल होऊ नये, यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था करण्यात यावी. तसेच प्रशासनाने सरसंघचालकांना मिठाई आणि फळे पाठवावीत, जेणेकरून त्यांना कळेल की, आम्ही आमच्या पाहुण्यांची कशी काळजी घेतो; परंतु लक्षात ठेवा की, ते अती करू नका, ते त्याचा (अप)लाभही घेऊ शकतात.

ममता बॅनर्जी त्यांच्या खुनी कार्यकर्त्यावर कारवाई करत नाहीत ! – भाजप

ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना दिलेल्या अशा सूचनांवर भाजपचे नेते दिलीप घोष यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे आदरणीय व्यक्ती आहेत. ते राज्यांना भेटी देत असतात आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याविषयी असे वक्तव्य करणे शोभत नाही. पोलीस आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते लोकांची हत्या अन् बलात्कार करत आहेत; पण सरकार त्यावर कोणतीही कठोर पावले उचलत नाही.

संपादकीय भूमिका

  • बंगालमध्ये हिंदू नाही, तर धर्मांध दंगली घडवतात, यावर ममता बॅनर्जी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • बंगालमध्ये प्रतिदिन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या रोखण्यासाठी ममता बॅनर्जी पोलिसांना आदेश का देत नाहीत ?
  • बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमणे आणि अत्याचार करण्यात आले, याविषयी ममता बॅनर्जी यांनी काय कारवाई केली, हे त्या का सांगत नाहीत ?