विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन देईपर्यंत सरकार झोपले होते का ?

‘विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने कायदेशीर अभ्यास करून पुरातत्व विभाग आणि अन्य संबंधित विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्याव्यात; गडावरील मंदिरांकडे झालेले दुर्लक्ष आणि त्यांची पडझड हे गंभीर असून यासंदर्भात काय करता येईल, तेही पहावे; गडाचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हावेत, असे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासनाला दिले. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने गडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यांनी वेळोवेळी शासनाला यासंबंधी निवेदने दिली होती.’