पणजी, ७ मे (वार्ता.) – सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी प्राप्तीकर खात्याच्या ३ निरीक्षकांना कह्यात घेतले आहे. मागील ३ मासांपासून या महिलेची संशयितांकडून सतावणूक केली जात होती. मनिंदर अत्तरी (देहली), आदित्य वर्मा (राजस्थान) आणि दीपक कुमार (बंगळूर) ही कह्यात घेतलेल्या निरीक्षकांची नावे आहेत.
#गोवा के पणजी में कार्यालय से जुड़े तीन आयकर अधिकारियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इन पर एक महिला अधीनस्थ कर्मचारी का यौन उत्पीड़न और धमकी देने का आरोप है। इसकी जानकारी शनिवार को पुलिस ने दी। pic.twitter.com/3IvYZRsARg
— IANS Hindi (@IANSKhabar) May 7, 2022
पीडित महिला प्राप्तीकर खात्यात संशयितांच्या हाताखाली काम करते. पीडित महिलेने पणजी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘‘तिघांपैकी मनिंदर अत्तरी आणि दीपक कुमार हे मागील २ मासांपासून माझी सतावणूक करत आहेत. माझ्या भ्रमणभाषवर अश्लील संदेश पाठवले जात आहेत. हे सर्व प्रकार असह्य झाल्याने मी तक्रार नोंदवत आहे. या प्रकरणी मनिंदर अत्तरी आणि दीपक कुमार हे मुख्य दोषी आहेत आणि तिसरा संशयित आदित्य वर्मा मला सतत डोळ्यांनी खुणावत होते.’’ पोलिसांनी तिन्ही संशयितांच्या विरोधात छेडछाड केल्याचा गुन्हा नोंदवला आहे, तसेच कार्यालयातील ‘सीसीटीव्ही फूटेज’ कह्यात घेतले आहे.