
ठाणे – जिल्ह्यातील दहिसर मोरी आणि ठाकूरपाडा गावात ६ मेच्या मध्यरात्री १२.१५ ते ३.४५ वाजण्याच्या कालावधीत एक मुसलमान महिला आणि ४ मुसलमान यांनी तलवारी, चाकू अन् कुर्हाडी घेऊन दहशत पसरवली, तसेच स्थानिकांना घाबरवले. अनेक घरांचे दरवाजे उचकटून रहिवाशांना विनाकारण धमकावले. या प्रकरणी जावेद सलीम शेख, दिलवर फरीद शेख, शाहिद नसीर शेख, साद अहमद आणि मारिया जावेद खान यांना अटक करण्यात आली आहे. या वेळी काही गावकर्यांनी धाडस दाखवत आरोपींना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. (स्थानिक रहिवासी समाजकंटक असणार्यांना पकडून देतात, तर मग रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणारे पोलीस काय करतात ? अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) पोलिसांच्या माहितीनुसार या लोकांच्या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असून त्यांना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. शस्त्र उगारण्यामागे त्यांचा हेतू काय होता, याचाही शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकाअल्पसंख्य गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! या घटनेवरून त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही, हेच दिसून येते ! |
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !