पोलिसांच्या वाहनावर चढून काच फोडली

ठाणे, ७ मे (वार्ता.) – येथील हरिनिवास भागात ५ मेच्या रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपक चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ध्वनीक्षेपक बंद करण्यासाठी गेले असता आमीर शाहीद खान (वय ३३ वर्षे) याने पोलिसांशी बाचाबाची करत त्यांना धक्काबुक्की केली, तसेच पोलिसांच्या वाहनाची काच फोडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून खान याला अटक करण्यात आली आहे. या वेळी आमीर याने पोलिसांना शिवीगाळही केली, तसेच ‘ध्वनीक्षेपक वाजवा’, असे जोरजोरात ओरडूही लागला. पोलीस त्याला समजावत होते; पण त्यांना न जुमानता तो पोलिसांच्या वाहनावर चढला आणि त्याने वाहनाची समोरील काच फोडली. घटनेची तीव्रता वाढू लागल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. (एका मुसलमानाला आवरू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांचा बंदोबस्त कसा करणार ? – संपादक) त्यानंतर पोलीस शिपाई ताजणे हे आमीर याला वाहनावरून खाली उतरवण्यासाठी गेल्यावर त्याने शिपायाला धक्काबुक्की केली.
संपादकीय भूमिकापोलिसांशी असे वागणारे हिंदूंशी कसे वागत असतील ? |
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !