दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक ! – वीरश्रीचे प्रतीक : गडदुर्ग

गडदुर्गांची सद्य:स्थिती लक्षात आणून देणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक : १४.५.२०२२

 या अंकात काय वाचाल ?

छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठीच्या दैवी कार्यात अतिशय मोलाचे योगदान देणारे गडदुर्ग ! या गडदुर्गांच्या अभेद्य कवचामुळेच पाच पातशाह्यांची सत्ता देशभर असूनही ती नेस्तनाबूत करून हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचे कार्य पूर्णत्वास गेले; मात्र या गडदुर्गांची आजची स्थिती विदारक झाली आहे. प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आपला हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गडदुर्गांची सद्य:स्थिती विस्ताराने कळावी आणि त्याविषयी कार्य करण्यास शिवप्रेमी जनता उद्युक्त व्हावी, हाच या विशेषांकाचा उद्देश आहे.

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !