लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यातील धार्मिक स्थळांवरील १ लाख भोंगे हटवण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. ‘एवढ्या मोठ्या संख्येने भोंगे उतरवल्याने राज्यातील गोंगाट अल्प झाला आहे. भोंगे उतरवण्याच्या काळात आतापर्यंत कोणताही वाद झालेला नाही’, असेही त्यांनी सांगितले.
“उत्तर प्रदेशात १ लाख भोंगे उतरवले, रस्त्यावरील नमाजही बंद”, योगी आदित्यनाथ यांचा दावाhttps://t.co/VHksntopgk#CMYogiAdityanath #Uttarpradesh #LoudSpeaker
— LoksattaLive (@LoksattaLive) May 4, 2022
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आम्ही केवळ भोंगेच काढले नाही, तर रस्त्यावर होणार्या नमाजपठणाविषयीही योग्य प्रकारे मार्ग काढला आहे. आम्ही ‘रस्त्यावर नमाजपठण करता येणार नाही’, अशी सूचना दिली होती. त्यानुसार आता रस्त्यावर कुणीही नमाजपठण करत नाही. उत्तरप्रदेशात कोट्यवधी मुसलमान वास्तव्यास आहेत; मात्र ईदला कुठेही रस्त्यावर नमाजपठण झाल्याचे समोर आलेले नाही. आता लोकही पुढे येऊन सरकारी आदेशांचे पालन करत असून रस्त्यांऐवजी घरी किंवा मशिदींमध्ये नमाजपठण करतात.
संपादकीय भूमिका
|