राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पोलिसांकडून भीम आर्मीचे अशोक कांबळे कह्यात !

संभाजीनगर, २ मे (वार्ता.) – संविधानाचे स्वागत आहे; मात्र सभा उधळून लावण्याच्या धमक्या किंवा प्रयत्न करत असाल, तर आम्ही मारण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या सभेची गर्दी पाहून गुदमरून मराल, अशी चेतावणी येथील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे.
Raj Thackeray Speech : '…तर सभेच्या गर्दीत चिरडून मराल', सभा उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या संघटनांना अविनाश जाधवांचं प्रत्युत्तर https://t.co/CWb6mWq1Nz @RajThackeray @mnsadhikrut @AbadCityPolice @Dwalsepatil #RajThackeray #Aurangabad #MNS #AvinashJadhav #BhimArmy
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 1, 2022
भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ‘राज ठाकरे यांना संविधान भेट देण्यात येईल’, असे सांगून पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींचे उल्लंघन केल्यास सभा उधळून लावण्यात येईल, अशी चेतावणी दिली होती.

१ मे या दिवशी येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेपूर्वी भीम आर्मी संघटनेचे अशोक कांबळे यांना पोलिसांनी कह्यात घेतले. ते पुणे येथून संभाजीनगर येथे येत असतांना पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे पोलिसांनी कांबळे यांना कह्यात घेतले असून अजून काही लोकांना कह्यात घेण्यासाठी पोलीस त्या लोकांचा शोध घेत आहेत.
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !