
कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरासह परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा अपलाभ घेत भाविकांकडील मौल्यवान वस्तू आणि पाकीट चोरणार्या सोलापूर येथील सविता गोविंद अवतळे या महिलेला जुना राजवाडा पोलीस अन् महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी सापळा रचून पकडले. सविता अवतळे हिच्याकडून जप्त केलेल्या पर्समध्ये ७ सहस्र रुपये आढळले. ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये संबंधित महिलेच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्याने पोलिसांनी दर्शन रांगेतून तिला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकासराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ? नीतीवान समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !