बागपत (उत्तरप्रदेश) – येथील ललियाना गावात ऑल विट या ६७ वर्षीय पाद्य्राला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पीडित मुलीचे कुटुंब चर्चजवळच रहाते. हा पाद्री मूळचा तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील फुत्तुर गावातील रहाणारा आहे.
A church priest was arrested on Sunday for allegedly raping an 11-year-old Dalit girl in Uttar Pradesh’s Baghpat district. https://t.co/UuK4PCeCi5
— Crimes Against Unprivileged (@DeprivedVoices) April 25, 2022
पीडित मुलीच्या आईने सांगितले की, आम्ही पुष्कळ गरीब आहोत. दिवसभर मी पती समवेत शेतात काम करतेे आणि मुलगी घरी असते. पाद्य्राने तिला चर्चमध्ये बोलावले आणि तिला पैसे देऊन तिला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बलात्कार केला. गावातील काही जणांनी माझ्या मुलीकडे पैसे पाहून आणि ती दुकानातून साहित्य खरेदी करत असल्याचे पाहून आम्हाला कळवले. यानंतर आम्ही मुलीला पैशांविषयी विचारल्यावर तिने घडलेली घटना सांगितली.
संपादकीय भूमिकापाश्चात्त्य देशांत गेली अनेक दशके अशा प्रकारे पाद्य्रांकडून लहान मुले, मुली, महिला, नन यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या शेकडो घटना उघडकीस आल्या आहेत. आता अशा घटना भारतातही घडत असल्याचे उघडकीस येत आहे. याविषयी पाद्य्रांना सभ्य, सुसंस्कृत समजणारे भारतीय त्यांचा खरे स्वरूप लक्षात घेतील का ? याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
|