फरिदाबाद (हरियाणा) येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

फरिदाबाद (हरियाणा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त १२ एप्रिल या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात आले. येथील सेक्टर २८ मधील श्री सिद्धपीठ हनुमान मंदिर, शिवशक्ती मंदिर आणि ‘सेक्टर २१ सीसी’मधील श्री सनातन धर्म हौसिंग बोर्ड मंदिरामध्ये ‘परात्पर गुरुदेव यांचे आरोग्य चांगले रहावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या अभियानाचा उद्देश समितीच्या कु. अनिता राणा यांनी उपस्थितांना सांगितला.

या वेळी शिवशक्ती मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर यांनी, तर श्री सनातन धर्म हौसिंग बोर्ड मंदिर येथे सनातन संस्थेचे श्री. गुलशन किंगर यांनी उपस्थितांकडून प्रार्थना आणि प्रतिज्ञा करवून घेतली. या दोन्ही ठिकाणी अनेक भाविक सहभागी झाले होते.

क्षणचित्र : या उपक्रमामध्ये श्री सिद्धपीठ हनुमान मंदिराचे पुजारी श्री. सुभाष आणि अन्य २ पुजारी यांनीही सहभाग घेतला.