अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांचे धर्मसंसदेत आवाहन
|
उना (हिमाचल प्रदेश) – भारतात लोकशाही असून हिंदू बहुसंख्य आहेत. सुनियोजित योजना आखल्याप्रमाणे मुसलमान अधिकाधिक मुलांना जन्म देत त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत. ‘भारत इस्लामी राष्ट्र होण्यापासून रोखायचे असेल, तर हिंदूंनी अधिक मुलांनी जन्म द्यावा’, असे विधान अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेशमधील प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी येथे आयोजित ३ दिवसीय धर्मसंसदेच्या पहिल्या दिवशी केले. हिमाचल प्रदेश पोलिसांनी ‘धर्मसंसदेत प्रक्षोभक विधाने करू नयेत’ अशी नोटीस पाठवली आहे.
यति सत्यदेवानंद सरस्वती के विवादित बोल – भारत को इस्लामिक देश बनने से बचाने के लिए हिंदू ज्यादा बच्चे पैदा करें, पुलिस ने जारी किया नोटिस#HimachalPradesh https://t.co/cK8pee4i3E
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 18, 2022
पत्रकारांनी यती सत्यदेवानंद सरस्वती यांना ‘दोनपेक्षा अधिक मुले असणे, हे आपल्या राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात नाही का?’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘केवळ दोनच मुले जन्माला घाला’, असे सांगणारा कोणताही कायदा आपल्या देशात नाही.’