मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभीपासूनचा वाचक आहे. या दैनिकात सर्व सत्य लिहिले जाते. समाजाला सद्यःस्थितीत आवश्यक आहे, ते लिहिले जाते. उत्सव, सण यांची चांगली माहिती मिळते. प्रतिदिन दैनिक वाचल्यावर आत्मिक समाधान मिळते. एक दिवस दैनिक वाचले नाही, तर चुकल्यासारखे होते.
धर्मशिक्षणावरील आणि साधकांच्या साधनेविषयीचे लेख वाचल्यावर प्रत्यक्ष पूजेपेक्षा मानसपूजेकडे वळावेसे वाटते. हिंदूंवरील आघात, हलाल प्रमाणपत्राची समस्या आदी गोष्टींविषयी वाचल्यावर ‘योग्य काय ?’, ते समजते.
– श्री. रामचंद्र करंबळकर, खडपाबांध, फोंडा, गोवा. (१६.४.२०२२)