गुरुग्राम (हरियाणा) येथे २२ किलोमीटर पाठलाग करून गोतस्करांना अटक

गोतस्करांनी पाठलागाच्या वेळी धावत्या ट्रकमधून खाली फेकल्या ७ गायी !

अशा अमानुष आणि निर्दयी गोतस्करांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी हरियाणातील भाजप सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

गुरुग्राम (हरियाणा) – येथे गोरक्षक आणि पोलीस यांनी २२ किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ट्रकमधून गोवंशियांची तस्करी करणार्‍या ६ गोतस्करांना अटक केली. या पाठलागाच्या वेळी या गोतस्करांनी ट्रकमधील ७ गायींना धावत्या ट्रकमधून रस्त्यावर फेकून दिले. या वेळी पोलिसांनी गोळीबार करून ट्रकचा टायर पंक्चर केला. तसेच टायर निखळूनही गेला; मात्र तरीही ट्रक पळवण्यात येत होता.

यहाया, बल्लू, तस्लीम, खालिद उपाख्य भैंसा, शाहिद आणि सोकीन उपाख्य सुंडा अशी या अटक करण्यात आलेल्या गोतस्करांची नावे आहेत.
बजरंग दलाचे कार्यकर्ते मोहन यांनी ट्रकमधून गोतस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

संबंधित ट्रक तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला थांबण्याची सूचना केली; मात्र चालकाने तो अधिक गतीने पळवला. त्यामुळे पोलिसांनी आणि गोरक्षकांनी त्याचा पाठलाग केला. या काळात काही गोतस्करांनी गाडीच्या बाहेर उड्या मारून पळून जाण्याचाही प्रयत्न केला.