महाप्रसादाचे व्यावसायिकीकरण झाल्याचा राग !
पुरी (ओडिशा) – येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक घरातून ४० चुली तोडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी जे. महापात्रा या ३० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याने गुन्हा स्वीकारला आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Temple Rosaghara Case –
The suspect identified in CCTV footage has just now been detained. Further interrogation is underway. @odisha_police @cmo_odisha @Puri_Official @MoSarkar5T pic.twitter.com/G0g3Vu34vb
— Puri Police (@SPPuri1) April 5, 2022
घटनेच्या वेळीचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर महापात्रा याची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली होती. महापात्रा याने सांगितले की, मंदिराच्या महाप्रसादाचे व्यावसायिकीकरण झाल्याने ते मला पटले नव्हते. भक्तांना प्रसाद मिळत नाही. काही जण यातून लाभ उठवत आहेत.