आर्थिक जिहादातून हिंदु व्यावसायिकांना संपवण्याच्या षड्यंत्राला रोखण्यासाठी वेळीच सिद्ध व्हा ! – मनोज खाडये

देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे उद्योजकांसाठी प्रथमच हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

सभेत बोलताना श्री. मनोज खाडये

देवगड – हिंदु व्यावसायिकांना उद्योगांमध्ये प्रतिस्पर्धी निर्माण केले जात आहेत. तसेच व्यवसायाची मक्तेदारी निर्माण केली जात आहे. अशाच पद्धतीने हिंदू खाटीक बांधवांच्या हातातील व्यवसाय संपुष्टात आला. ‘हलाल’ हे संकट एवढ्यापुरतेच मर्यादित नसून विविध उद्योगधंद्यांवरही ते घोंघावत आहे. ‘हलाल’ अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देत असून हिंदु व्यापारी बांधवांनी या आर्थिक जिहादला तोंड देण्यासाठी वेळीच सिद्ध व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात ४ एप्रिल या दिवशी केवळ उद्योजकांसाठी म्हणून सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या
वेळी ते बोलत होते.

दीपप्रज्वलन करतांना (उजवीकडे) सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. मनोज खाडये

सभेच्या प्रारंभी सनातनचे धर्मप्रसारक सद्गुरु सत्यवान सत्यवानकदम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान शासकीय ठेकेदार श्री. धनाजी मोहिते यांनी, श्री. मनोज खाडये यांचा सत्कार जामसंडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील यांनी केला. सभेचे सूत्रसंचालन श्री. हेमंत पुजारे आणि कु. पूजा मांजरेकर यांनी केले.

अभिप्राय

१. श्री. रमाकांत आचरेकर : धर्मकार्यासाठी समितीचे कार्यकर्ते मोठ्या चिकाटीने प्रयत्न करत आहेत.

२. श्री. धनाजी मोहिते : वैचारिक मरगळ दूर करून लोकांमध्ये धर्मरक्षणासाठी जागृती केल्याबद्दल धन्यवाद !

३. सौ. माधुरी विनायक पाटील : आपण सांगितलेली सर्व सूत्रे महत्त्वाची आहेत. विशेष करून ‘लव्ह जिहाद’कडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्र झालेच पाहिजे.

४. सौ. मिताली रमेश सावंत : व्यापार करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी भारत देशाला गुलाम केले. त्याचप्रमाणे आताही होऊ शकते, तशा संकटाची ही चाहुल आहे. त्यामुळे प्रत्येकाने संघटित होऊन लढा दिला पाहिजे. प्रत्येक वेळी सतर्क राहिले पाहिजे.

५. श्री. आत्माराम कोयंडे : ‘हलाल’ प्रमाणपत्राविषयी पुष्कळ  समग्र माहिती मिळाली. सभेतील प्रबोधनाने फार चांगले वाटले. आज अशा जनजागृतीची हिंदु समाजाला पर्यायाने राष्ट्राला आवश्यकता आहे.

६. श्री. अमित शिंदे : मार्गदर्शन ऐकतांना रक्त सळसळत होते; पण एकत्र येण्यासाठी पुष्कळ काही करावे लागेल.

७. सौ. दीपश्री खाडिलकर : सात्त्विक वातावरणाचा अनुभव मिळाला. त्यामुळे प्रसन्न वाटत होते. ‘हलाल’ प्रमाणपत्राविषयी माहिती मिळाली.

८. श्री. अभिजीत रानडे : चांगले आणि उद्बोधक विचार होते. वक्ते बोलत असतांना फार चांगले वाटले आणि मानसिक शांतता अनुभवता आली. पुढील कार्यक्रमात मी नक्की उपस्थित रहाण्याचा प्रयत्न करीन.

९. श्री. दिनेश खाडिलकर : आपले अस्तित्व आपणच टिकवले पाहिजे. त्यासाठी पुष्कळ काही केले पाहिजे. सर्वांना ते शक्य नसेल, तर ज्यांना मनापासून वाटते त्यांनी हिंदु जनजागृती समितीला जमेल ते सहकार्य केले पाहिजे.