
सांगली, ६ एप्रिल (वार्ता.) – सांगली विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या ४ एप्रिल या दिवशी झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध विकासकामांचे उद्घाटन आणि गरजवंतांना साहाय्य करण्यात आले. गावभाग येथील केशवनाथ मंदिरात श्री. गाडगीळ यांच्या दीर्घायुष्यासाठी महारुद्राअभिषेक करण्यात आला. नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांनी या अभिषेकाचे आयोजन केले होते.

नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रभाग क्रमांक १० मधील ८० लाख रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. घन:शामनगर येथील कर्णसंस्थेमध्ये तेथील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तर यशवंतनगर, कुपवाडमध्ये भगिनी निवेदिता संस्थेमध्ये ‘एल्.सी.डी. टीव्ही’ प्रदान करण्यात आला. आपटा पोलीस चौकी जवळील बेघर लोकांसाठी अन्नदान करण्यात आले, तसेच गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ यांना अनेकांनी प्रत्यक्ष भेटून आणि दूरभाषद्वारे शुभेच्छा दिल्या. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर यांनी भेटून आमदार श्री. गाडगीळ यांना शुभेच्छा दिल्या.
हार्बर रेल्वेत लावली आहेत ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके !
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
FATF Vice Presidency : विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या उपाध्यक्षपदी निवड !
TMC, BJP Workers Clash : कोलकाता विमानतळावर तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट
Karnataka Fake Doctors : दावणगेरे (कर्नाटक) जिल्ह्यात ४० बनावट डॉक्टर आढळले !
Andhra Pradesh Gold : आंध्रप्रदेशात ५० टन सोन्याचा साठा सापडल्याचा दावा