प्रसारातील आणि सनातनच्या आश्रमांतील साधकांसाठी सूचना !
‘प्रसारात, तसेच सनातनच्या आश्रमांत विविध कार्यक्रम अथवा उपक्रम, उदा. संतसन्मान सोहळा, ग्रंथप्रकाशन सोहळा, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा वर्धापनदिन सोहळा इत्यादी होत असतात. या कार्यक्रमांच्या वेळी अनेक साधक व्यासपिठावर जाऊन स्वत:चे अनुभवकथन, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे सांगतात. व्यासपिठावर जातांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
१. साधकांनी व्यासपिठावरील ‘पोडियम’च्या जवळ उभे राहून व्यासपिठावर आसनस्थ असलेले संत आणि मान्यवर यांना हात जोडून एकत्रित नमस्कार करावा.
२. संत आणि मान्यवर यांना नमस्कार केल्यावर साधकांनी समोर बसलेले श्रोते, साधक आदींना नमस्कार करावा आणि त्यानंतर आपल्या अनुभव कथनाला आरंभ करावा.
३. आपले बोलणे पूर्ण झाल्यावर खाली जाण्यापूर्वी साधकांनी पुन्हा एकदा वरीलप्रमाणेच संत, मान्यवर आणि श्रोते यांना नमस्कार करावा.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)