मुंबई – मुंबईमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रपाळी करण्याचा आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काढला आहे. यामध्ये पोलीस सहआयुक्तांना १५ दिवसांतून एकदा, तर अप्पर पोलीस आयुक्तांना १० दिवसांतून एकदा रात्रपाळी करावी लागणार आहे. मुंबईच्या आतापर्यंतच्या इतिहासात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रात्रपाळी करण्याचा निर्णय प्रथम घेण्यात आला आहे.