भारतात अनेक राज्यांमध्ये पुजारी, संत आणि महंत यांच्या हत्या झाल्या आहेत. हिंदुबहुल देशात हिंदूंना धार्मिक मार्गदर्शन करणाऱ्यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !

गुरुग्राम (हरियाणा) – येथील कादरपूर गावातील मोहन राम मंदिरातील गोविंद दास नावाच्या ९० वर्षीय पुजाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी पुजाऱ्याचे शीर धडापासून वेगळे केले आणि नंतर पुजाऱ्याचा मृतदेह ब्लँकेटने झाकून पलायन केल्याचे आढळून आले आहे.
देश – गुरुग्राम में 90 वर्षीय बुजुर्ग पुजारी की हत्या:तेजधार हथियार से … https://t.co/cIfMVGx4E6…….पूरी खबर को पढ़ने के लिए लिंक खोलें
— India Samachar ™ (@indiasamachar_) March 30, 2022
४० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले, तेव्हापासून गोविंद दास येथे पुजारी म्हणून सेवारत होते. गेल्या एक वर्षापासून ते अर्धांगवायूने त्रस्त असल्याने त्यांना चालताही येत नव्हते. त्यांच्यासाठी मंदिरात एक सेवक ठेवलेला होता. हा सेवक २९ मार्च या दिवशी सकाळी त्याच्या गावी गेला आणि त्याच रात्री उशिरा गोविंद दास यांची हत्या झाली. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
शिक्षण सचिवांचे स्थानांतर : नवा कायदाही करणार !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !