बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी होणार !

कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

घोटाळा होत नाही, असे एकतरी सरकारी क्षेत्र आहे का ? – संपादक

कोलकाता – बंगालमधील साहाय्यक शिक्षकांच्या अवैध नियुक्तीची चौकशी करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने नुकताच केंद्रीय अन्वेषण विभागाला (‘सीबीआय‘ला) दिला. यापूर्वी उच्च न्यायालयाने मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ६ साहाय्यक शिक्षकांच्या नियुक्त्या रहित केल्या होत्या. ‘पश्‍चिम बंगाल शाळा सेवा आयोगा’च्या शिफारशीनंतर त्यांची अवैधरित्या नियुक्ती करण्यात आली होती, असे उच्च न्यायालयाने नमूद केले.

न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांच्या एक सदस्यीय पीठाने या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवले असून सीबीआयच्या संयुक्त संचालकांच्या देखरेखीखाली हे अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे. (सरकारने या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक)