कर्नाटकमधील २ शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड !

  • या तोडफोडीमागे कुणाचा हात आहे, याचा शोध घेऊन संबंधितांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

  • ‘राज्यात सध्या चालू असलेल्या हिजाबच्या प्रकरणावरून या घटना घडल्या आहेत का ?’, याचाही शोध घेतला पाहिजे ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील २ वेगवेळच्या शहरांतील शाळांमध्ये असणार्‍या श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील चिंचणी गावातील प्राथमिक सरकारी शाळेतील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे शिवमोग्गा येथील हरोहल्ली गावातील शाळेत असणार्‍या श्री सरस्वतीदेवी, म. गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्याही मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.