उत्तम नियोजनकौशल्य असणारे आणि कर्तेपणा देवाला अर्पण करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !

श्री. निनाद गाडगीळ

१. इतरांना समजून घेणे

निनाददादाकडे अनेक सेवांचे दायित्व असूनही तो लहान-थोर सर्वांना समजून घेऊन त्यांच्या अडचणींविषयी आवश्यक ती उपाययोजना सांगतो. त्यामुळे सर्वांना त्याचा आधार वाटतो.

कु. नलिनी राऊत

२. उत्तम नियोजनकौशल्य

दादाला कर्ता म्हणून घरातील दायित्वही पहावे लागते, तसेच त्याच्याकडे आश्रमातील सेवांचे दायित्व आहे. हे सर्व तो शांतपणे, कौशल्यपूर्ण रितीने आणि आनंदाने पार पाडतो.

३. कर्तेपण देवाला अर्पण करणे

त्याला कधीही कोणतीही अडचण सांगितली, तरीही तो तत्परतेने साहाय्य करतो. ती अडचण सोडवल्याविषयी त्याला धन्यवाद दिल्यास तो नम्रपणे ‘देवानेच करून घेतले’, असे सांगून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

४. व्यष्टीचे गांभीर्य असणे

दादा नियमितपणे आश्रमातील फलकावर स्वतःच्या चुका लिहितो.

– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.६.२०२०)