प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्यावर पुन्हा प्रतिमा स्थापन करण्याचे आश्वासन
राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेत असल्याने तेथे अशा हिंदूविरोधी घटना घडतात. सरकारने असे धाडस अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते का ? – संपादक
चुरू (राजस्थान) – रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली येथील सालासर मार्गावरील सुजानगडाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या ‘राम दरबार’ची प्रतिमा तोडल्याने येथे तणाव निर्माण झाला. भगवान श्रीराम आणि अन्य देवतांच्या मूर्ती येथून स्थलांतरित करण्याऐवजी कंत्राटदाराने त्या थेट ‘जेसीबी’ यंत्राद्वारे तोडून टाकल्याने संतप्त झालेल्या हिंदु संघटनांनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करून हनुमान चालिसाचे पठण केले.
राजस्थान में सालासर रोड पर स्थित सुजानगढ़ के प्रवेश द्वार पर स्थित ‘राम दरबार’ की प्रतिमा तोड़े जाने के बाद विपक्ष राजस्थान सरकार पर हमलावर है।https://t.co/O0UGe0hb3B
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 20, 2022
या वेळी पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची क्षमायाचना केली, तसेच त्यांनी ‘रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर येथे प्रवेशद्वार बनवून पुन्हा ‘राम दरबारा’ची प्रतिमा स्थापन करण्यात येईल’, असे आश्वासन दिले; मात्र त्यांनी लेखी आश्वासन देण्यास नकार दिला. (जर प्रशासनला खरोखरच ‘राम दरबार’ची प्रतिमा पुन्हा स्थापन करायची आहे, तर त्यांना लेखी आश्वासन देण्यात काय अडचण आहे ? यावरून ‘प्रशासनाचे हे केवळ आश्वासन असून प्रत्यक्षात ते ‘राम दरबार’ची प्रतिमा स्थापन करणार नाहीत’, असे हिंदूंनी समजायचे का ? – संपादक)