उप्पिनंगाडी (कर्नाटक) येथे २३१ धर्मांध विद्यार्थिनींचा हिजाब न घालता परीक्षा देण्यास नकार

‘कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यास नकार देणार्‍या अशा विद्यार्थिनी शिक्षण घेऊन तरी काय दिवे लावणार आहेत ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो ! अशांना महाविद्यालयाने महाविद्यालयातून काढून टाकणेच योग्य ठरेल, असेच जनतेला वाटते ! – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून येण्यावर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. असे असतांनाही राज्यात धर्मांध विद्यार्थिनींकडून त्याचे पालन करण्याचे टाळले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.

राज्यातील उप्पिनंगाडी येथे २३१ धर्मांध विद्यार्थिनींनी हिजाब न घालता परीक्षा देण्यास नकार दिला. येथील सरकारी पीयू महाविद्यालयाच्या परिसरात या विद्यार्थिनींनी आंदोलन केले. या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाने सांगितले, ‘कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य आहे.’