८ मार्च २०२२ या दिवशी असलेल्या ‘महिलादिना’च्या निमित्ताने…
‘शरिराचे अवयव कुठून येतात ? हे तुम्हाला ठाऊक आहे का ? तुम्ही ऐकले असेल, ‘४० लाख रुपये देऊन मूत्रपिंडाचे रोपण करा ! तेही १६ ते २५ वर्षे वयातील संपूर्ण निरोगी मूत्रपिंड !’ आता विचार करा की, शरिराचे हे अवयव येतात कुठून ? शवागारात पडलेल्या मृतदेहांमधून कि अपघातात मृत झालेल्या व्यक्तींमधून ? बरोबर आहे; पण अजून एक ठिकाण आहे आणि ते आहे, भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली ! या मुली सिगारेट, गुटखा खाणे किंवा मद्यपान करत नाहीत. त्यांचे दात, हाडे, आतडे, त्वचा, हृदय, यकृत (लिव्हर), मूत्रपिंड सर्व चांगले आणि प्रत्यारोपण करण्यासाठी योग्य असतात.
१. मुलींना प्रलोभन देऊन फसवणे
मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून किंवा नोकरीचे प्रलोभन देऊन कुठेही घेऊन जाणे सोपे असते. त्यामुळे दिसायला सुंदर असलेली मुले त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवतात आणि त्यांच्यापासून पैसा कमवतात. ही मुले वास्तवामध्ये व्यावसायिक गुन्हेगार असतात. ते पैशासाठी काहीही करू शकतात.
२. लाखो मुली बेपत्ता होणे
प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारीच्या शेवटच्या २ आठवड्यांमध्ये मध्यमवर्गातील २ ते ४ लाख मुली घरातून बेपत्ता होतात. (१४ फेब्रुवारी दिवशी ‘व्हॅलेंटाईन डे’ असतो.) त्यांचा कुणी शोधही घेत नाही आणि ‘मुलगी प्रेमापोटी घरातून पळून गेली’, असा अहवाल दिला जातो. त्यामुळे कोणताही गुन्हा नोंद होत नाही. त्यानंतर मुलगी आणि तिचा प्रियकर मुलगा यांचा ठावठिकाणा मिळत नाही. थोडा विचार करा. या मुली कुठे पोचतात ?
३. आधी या मुलींचे भरपूर प्रमाणात शारीरिक शोषण केले जाते. त्यानंतर त्यांची हत्या केली जाते आणि त्यांच्या शरिराचे अवयव विकून पैसे कमवले जातात. तुम्ही ‘गूगल’वर ‘मानवी अवयवांचे काळ्या बाजारातील मूल्य’, असा शोध घ्या. तुम्हाला त्यांचे भाव समजतील. नंतर अवयव प्रत्यारोपणासाठी येणारा व्यय पहा. जर एका मुलीच्या शरिराच्या अवयवांची खरोखर चांगली किंमत मिळाली, तर किमान ५ कोटी रुपये आरामात मिळतात.
४. एकूण सद्य:स्थिती पहाता ‘लव्ह जिहाद’ आणि ‘मानव तस्करी’ यांवर ना कधी कायदा बनतो, ना कुणी बनू देत. हे सर्व बहुतांश अशाच मुलींच्या संदर्भात होते, ज्यांचे कुटुंब कमकुवत असते किंवा त्यांचा कुठेही राजकीय प्रभाव नसतो.
हे पण पहा –
♦ ‘महिला दिन’ निमित्त सनातन संस्था आयोजित करत आहे ऑनलाईन कार्यक्रम ‘जागर स्त्री शक्तीचा’ !
५. मुली किंवा बहीण यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे कर्तव्य पार पाडा !
वर्ष २०१५ मध्ये उत्तरप्रदेशमधून ४ सहस्र मुली, तर वर्ष २०१७ ते २०१८ मध्ये ७ सहस्र मुली बेपत्ता झाल्या. (वर्ष २०२० मध्ये १ सहस्र १६६ मुली बेपत्ता झाल्या आहेत) या घटना बहुतांश लक्ष्मणपुरी, देहली, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आढळून येतात. आज आमच्या लाडक्या मुली किंवा बहीण यांना अनेक गोष्टींची माहिती आहे; परंतु त्यांना गुन्हेगारीविश्व आणि प्रत्यारोपणासाठी अवयव कुठून येतात ? हे माहिती नसते. त्या या षड्यंत्राला बळी पडू नये, यासाठी आपल्या मुली-बहिणींकडे लक्ष दिले पाहिजे; कारण जे बाहेर घडत आहे, ते आमच्या घरात कधीही होऊ शकते. आपल्या मुली किंवा बहिणी यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे कर्तव्य पार पाडा ! कुणाच्याही बोलण्यात फसू नका. सावध रहा, सतर्क रहा !’
– राजदेव द्विवेदी, सहसंपादक, ‘आवाज आपकी’ संकेतस्थळ