समाजाची विकृत मनोवृत्ती सुधारण्यासाठी धर्मशिक्षण देणे आणि त्यानुसार समाजाकडून आचरण करून घेणेच आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! – संपादक

पुणे – जिल्ह्यातील वेल्हे शहरातील अडीच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करणारा नराधम संजय काटकर याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनुसार शिवाजीनगर न्यायालयामध्ये जलदगतीने खटला चालवण्यात आला होता.
वेल्हे पोलीस ठाण्यामध्ये १५ फेब्रुवारी २०२१ या दिवशी मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मुलीचा शोध घेतांना १६ फेब्रुवारी या दिवशी मालखेड ते थोपटेवाडीकडे जाणार्या रस्त्यावर मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. वेल्हे पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फुटेज’ आणि रिक्शावाला, दुकानदार अन् इतर साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दुर्गम भागांतून ४८ घंट्यांमध्ये कह्यात घेतले होते.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)