‘रशिया-युक्रेन युद्ध : तृतीय महायुद्धाची नांदी आहे ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – ‘रशिया-युक्रेन यांमध्ये युद्ध झाल्यास युक्रेनला पूर्ण साहाय्य करू’, असे अनेक पाश्चात्त्य देश सांगत होते; मात्र प्रत्यक्षात रशियाने युक्रेनच्या सैन्यासह नागरी वस्त्यांवर आक्रमण केल्यावरही कोणत्याही देशाने युक्रेनच्या साहाय्यासाठी प्रत्यक्ष कोणतीही सैन्य कारवाई केली नाही. त्यामुळे या युद्धात युक्रेन एकटा पडला आहे. या सर्वांचा परिणाम उद्या चीनही अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांच्या धमक्यांना न घाबरता थेट तैवानला स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी युद्ध करू शकतो. तैवाननंतर चीनचे पुढील लक्ष्य भारत असू शकते. गेली ८ वर्षे चीनने ‘ग्रे वॉरफेअर झोन’ (प्रत्यक्ष युद्ध न करता सतत युद्धाची स्थिती निर्माण करणे) निर्माण केलेला आहे. यात चीन हा रशियापेक्षा पुष्कळ पुढे आहे. तसेच रशिया हा चीनचा सर्वांत मोठा मित्र असल्यामुळे भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल. त्यासाठी भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्धसामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला पाहिजे, असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘रशिया-युक्रेन युद्ध : तृतीय महायुद्धाची नांदी आहे ?’, या विषयावर २६ फेब्रुवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी (निवृत्त) ब्रिगेडियर महाजन यांच्याशी संवाद साधला.

‘नाटो’चे सदस्य असलेले देश केवळ धमक्या देतात’, असे चित्र निर्माण होण्याची शक्यता असणे !
युक्रेनच्या साहाय्यासाठी ‘नाटो’चे (उत्तर अटलांटिक करार संघटना) सदस्य असलेले देश त्यांचे सैन्य पाठवण्यास सिद्ध नाही. ‘नाटो’ सैन्य हे विश्वातील सर्वांत सक्षम आणि आधुनिकीकरण झालेले सैन्य आहे. ते कोणतेही युद्ध लढण्यास सक्षम आहे; मात्र पाश्चात्त्य देशांनी वैज्ञानिक प्रगती करून अनेक गोष्टींमध्ये ते आधुनिक झाले असले, तरी त्यांच्यात युद्ध लढण्याचे धाडस नाही. यामुळे विश्वभरात ‘नाटो’चे सदस्य असलेले देश केवळ धमक्या देतात; पण प्रत्यक्षात काही करत नाहीत’, असे चित्र निर्माण होणार आहे.
देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आतंकवादाचे कंबरडे मोडावे !
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. अन्य वस्तूंचेही भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात आपल्याला अंतर्गत वादविवाद, राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबवून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, बनावट (खोट्या) नोटांचा कारभार, पाक अन् बांगलादेशी घुसखोरी, नार्काे टेरिरिझम (अमली पदार्थांद्वारे करण्यात येणारा जिहाद) आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे. मग पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.
_____________________________________________
हे पहा –
♦ हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘विशेष संवाद’में “रशिया-युक्रेन युद्ध : तृतीय विश्वयुद्ध का प्रारंभ है ?”
______________________
मृत्यूंजय वीर आणि शौर्यचक्राचे मानकरी हवालदार पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण