सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), पुणे
१. श्रीमती केसकरकाकूंच्या मुलीने सेवेला प्राधान्य द्यायला सांगणे
‘केसकरकाकांचे निधन झाल्याचे समजल्यावर आम्ही काही साधिका त्यांच्या घरी जाणार होतो. त्यामुळे आम्ही श्रीमती केसकरकाकूंची मुलगी सौ. रश्मी नाईक यांना विचारले, ‘‘आम्ही आईला भेटायला केव्हा येऊ ?’’ तेव्हा ताईने सांगितले, ‘‘तुम्हाला सेवा असल्यास सेवेलाच प्राधान्य द्या. धावपळ करून येऊ नका.’’
२. घरातील वातावरण शांत असणे
केसकरकाकूंच्या घरी गेल्यावर ‘घरात कुणाचे निधन झाले आहे’, असे मला वाटले नाही. घरातील वातावरण शांत होते.
३. केसकरकाकांना त्रास न झाल्याबद्दल केसकरकाकूंनी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
काकू म्हणाल्या, ‘‘केसकरकाका शेवटपर्यंत घरात फिरत होते. त्यांना कसलाही त्रास झाला नाही.’’ असे सांगून त्या सतत गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत होत्या. त्या स्थिर आणि शांत होत्या.
‘कुटुंबातील सर्व जण साधनेत असल्यावर केवळ परात्पर गुरुदेवांमुळे अशा कठीण परिस्थितीत स्थिर आणि शांत रहाता येते’, हे या प्रसंगातून शिकायला मिळाले.’
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
१. केसकरकाकूंचे वय अधिक असूनही त्यांनी यजमानांची सेवा ‘गुरुसेवा’ या भावाने करणे
‘श्रीमती केसकरकाकूंचे वय अधिक असूनही त्यांनी काही वर्षे यजमानांची सेवा पुष्कळ सेवाभावाने आणि गुरुसेवा म्हणून केली. यजमानांच्या सेवेत कधी काही उणीव राहिल्यास त्या क्षमायाचना करत असत.
२. यजमानांच्या निधनानंतरही स्थिर असणे
केसकरकाकांचे निधन झाल्याचे कळल्यावर मी काकूंशी भ्रमणभाषवर बोलले. त्या वेळी त्या स्थिर होत्या. काकूंच्या बोलण्यातून ‘त्यांच्या घरी असा प्रसंग झाला आहे’, असे जाणवत नव्हते. त्यांनी मला विचारले, ‘‘आता मी कोणती प्रार्थना करू ?’’
३. सेवेची तळमळ
यजमानांच्या निधनानंतर २ दिवसांनी काकूंनी मला सांगितले, ‘‘आता मला समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा असल्यास सांगत जा. मी अधिक वेळ देऊन ती सेवा करीन.’’
परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव असणार्या, सर्व प्रसंग आणि प्रारब्ध अत्यंत सकारात्मक राहून स्वीकारणार्या श्रीमती केसकरकाकूंकडून मला शिकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२९.१.२०२२)