उत्साही, आनंदी आणि स्वतःच्या देहप्रारब्धाकडे साक्षीभावाने पहाणारे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

कु. सुप्रिया जठार

१. सकारात्मक आणि आनंदी असणे

‘श्री. देशमुखकाका यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी आनंदी असतात आणि प्रत्येक परिस्थिती सकारात्मक राहून स्वीकारतात.

२. उत्साही

‘देशमुखकाकांमधील उत्साह ‘तरुणांना लाजवेल’, असा आहे. काकांचे घर संभाजीनगर येथे आहे. काही वर्षांपूर्वी काका ‘गोवा ते संभाजीनगर आणि संभाजीनगर ते गोवा’, असा एकूण १४०० कि.मी. प्रवास स्वतः चारचाकी चालवत करत होते. तेव्हा त्यांचे वय ७० वर्षे होते.

३. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणे

काकांचे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. ते मराठी भाषेतील लिखाणाचे इंग्रजीमध्ये आणि इंग्रजी भाषेतील लिखाणाचे मराठीमध्ये भाषांतर करण्याची सेवा करत असत. त्यांना एखादा शब्द अडला, तरी त्यांच्यातील सेवेच्या तळमळीमुळे त्यांना लगेच योग्य शब्द सुचत असे किंवा सापडत असे. ‘शब्द अडल्यामुळे त्यांचा वेळ गेला’, असे कधी झाले नाही.

४. प्रतिदिन ८ – ९ घंटे सेवा करणे

श्री. देशमुखकाकांमधे सेवेची तीव्र तळमळ आहे. आता त्यांचे वय ७५ वर्षे आहे, तरीही आतापर्यंत ते ‘तरुणांना लाजवेल’, अशी प्रतिदिन ८ – ९ घंटे सेवा करत होते. ‘सध्या ते रुग्णाईत असल्यामुळे त्यांना सेवा करता येत नाही’, याची त्यांना खंत वाटते.

५. स्थिर राहून कठीण परिस्थिती स्वीकारणे

‘काकांमधील स्थिरतेचे स्थितप्रज्ञतेत रूपांतर होत आहे’, असे मला जाणवते. काकांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) निकामी झाली आहेत. हे काकांना कळले, तेव्हाही काका स्थिर होते.

६. साक्षीभाव

ते त्यांच्या आजाराकडे साक्षीभावाने पहातात.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणे

काकांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. काकांमधील भाव त्यांचे बोलणे आणि कृती यांतूनही व्यक्त होतो.’

– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२२)