‘श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली’, हे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. पूर्वी आम्ही दोघांनी (श्री. देशमुखकाका आणि मी) एकाच आस्थापनात नोकरी केली आहे. आता आम्ही दोघेही रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतो.
१. ‘देशमुखकाका नेहमी आनंदी असतात.
२. नम्र
काकांनी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी’ या मोठ्या आस्थापनात अधिकारीपदावर काम केले आहे. असे असूनही त्यांचे वागणे नम्रतेचे आहे. ते लहान-थोर, सर्वांशी मिळून-मिसळून रहातात आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलतात.
३. माझी काकांशी ‘एक अधिकारी’ यापेक्षा ‘एक साधक’, या नात्याने चांगली मैत्री झाली.
४. मायेची ओढ नसणे
काकांचा परिवार मोठा आहे; पण त्यांना घरची ओढ नाही.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणे
काकांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. अशा स्थितीतही ते म्हणतात, ‘‘काळजी कशाला करायची ?’’ त्यांची ‘आपण गुरुदेवांच्या छत्रछायेत आहोत, तर ते आपली सर्व काळजी घेणारच आहेत’, अशी अतूट श्रद्धा आहे.
‘हे गुरुदेवा, तुमच्या कृपेनेच मला देशमुखकाकांसारखे साधक मित्र लाभले आणि त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अशोक लक्ष्मण रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२२)