(मौलाना म्हणजे इस्लामी विद्वान)
हिंदु संतांवर खोटे आरोप झाल्यावर त्याविषयी ‘ब्रेकिंग न्यूज’ चालवणारी प्रसारमाध्यमे मौलानाची कुकृत्ये दडपतात !

भाग्यनगर (तेलंगणा) – येथील दारूल उलूम मदरशामध्ये एका १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तेथे अरबी भाषा शिकवणार्या २५ वर्षांच्या मौलाना शोएब अख्तर याला अटक करण्यात आली. मौलाना अख्तर याने मुलाला त्रास दिल्याचे कळताच पीडित मुलाच्या नातेवाइकांसह स्थानिक लोकांनी मदरशाला घेराव घातला. वैद्यकीय परीक्षणानंतर आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आली. २ मासांपूर्वीच पीडित मुलाने मदरशामध्ये प्रवेश घेतला होता. ७ फेब्रुवारीच्या रात्री मुलाला असह्य त्रास होत असल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा मुलाने मौलाना अख्तर करत असलेल्या अत्याचारांविषयी सांगितले.
यापूर्वी देशातील काही मदरशांत घडलेली काही कुकृत्ये !
मदरशांमधील कुकृत्याच्या अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत असतात.
१. नोव्हेंबर २०२१ मध्ये दादरा नगर हवेलीच्या सिलवासामध्ये एका मौलवीवर (इस्लामच्या धार्मिक नेत्यावर) मदरशाच्या वसतीगृहामध्ये राहून शिकणार्या अल्पवयीन मुलीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
२. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यामध्ये मदरशातील मौलाना तबरेज याने मदरशामध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने ती गरोदर राहिली.
३. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मुफ्ती (शरियत कायद्याचे जाणकार) उशर्रफ याला बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक