तळमळीने सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गिरगाव (मुंबई) येथील सौ. विद्या कामेरकर !

सौ. विद्या कामेरकर

१. आतिथ्यशील

मी त्यांच्या घरी कधी गेलो, तर त्या आनंदाने माझे स्वागत करतात.

२. अध्यात्माची आवड

अनेक वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले मुंबई येथे वास्तव्याला होते. त्या वेळी मी कुलाबा येथे सत्संग घेण्यासाठी जात होतो. त्या सत्संगाला सौ. कामेरकर एकट्याच येत होत्या; म्हणून मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले, ‘‘सौ. कामेरकर एकट्याच सत्संगाला येतात.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘त्या एकट्याच येत असतील, तरी तुम्ही सत्संग घ्यायला जा.’’ त्या वेळी ‘गुरुदेवांनी असे का सांगितले ?’, हे मला आता समजले.’

३. इतरांचा विचार करणे

‘आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही’, याकडे त्यांचे लक्ष असते.

४. सेवेची तळमळ

अ. त्या सेवेचा अहवाल मी नोकरी करत असलेल्या कार्यालयात आणून देतात.

आ. त्यांना घरातील व्यक्तींचे साधनेसाठी साहाय्य मिळत नाही, तरी त्या तळमळीने सेवा करतात.’

– श्री. रंगनाथ खोत, परळ, मुंबई. (१.९.२०२०)