(म्हणे) ‘उत्तरप्रदेश सरकारने गेल्या ५ वर्षांत हिंदुगिरी केली !’- समाजवादी पक्षाचे आमदार रफिक अन्सारी

  • काश्मीरमध्ये गेली ३ दशके काय चालू आहे, याविषयी रफिक अन्सारी का बोलत नाहीत ? – संपादक
  • समाजवादी पक्षाचे राज्यात पूर्वी सरकार असतांना हिंदूंची काय स्थिती होती, हे देशातील जनतेला ठाऊक आहे. त्याविषयी अन्सारी का बोलत नाहीत ? – संपादक
समाजवादी पक्षाचे आमदार रफीक अन्सारी

मेरठ (उत्तरप्रदेश) – राज्यातील सरकारने गेल्या ५ वर्षांत हिंदुगिरी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हिंदुगिरी चालू आहे. आता पुन्हा भाजपचे सरकार आले, तर मेरठमध्ये ते गुंडगिरी करील. मेरठमधील मुसलमान कधी कुणामुळे दबलेला नाही; मात्र या सरकारने त्यांना दाबण्याचा, चिरडण्याचा प्रयत्न केला. ही स्थिती वाईट आहे; मात्र सरकारशी लढण्यापासून आम्हाला कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, असे विधान येथील समाजवादी पक्षाचे आमदार रफीक अन्सारी यांनी केले आहे. याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

याविषयी राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि भाजपचे नेते बृजलाल यांनी म्हटले, ‘गुंड, दंगलखोर, सराईत गुन्हेगार यांना समाजवादी पक्षाने निवडणुकीची तिकिटे दिली आहेत. या पक्षाला राज्यात पुन्हा गुंडांचे राज्य आणायचे आहे. समाजवादी पक्षाने  रफीक अन्सारी, नाहिद हसन, असलम चौधरी, हाजी यूनुस, मदन भैया, अमरपाल,  दिलनवाज आदींना तिकिटे दिली आहे, हे सर्व गुंड आहेत.’