आरोपी अनारुल शेख याला अटक
बंगाल म्हणजे बाँबनिर्मितीचा कारखानाच होय ! – संपादक
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांदी भागामधून ६ जिवंत गावठी बाँब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी हे बाँब निकामी केले आहेत. या प्रकरणी अनारुल शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याची याविषयी चौकशी करण्यात येत आहे.
मागील आठवड्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा भागामध्ये बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात यासुद्दीन शेख उपाख्य चांदी शेख याचा मृत्यू झाला होता, तर ५ जण घायाळ झाले होते. मुर्शिदाबाद हा भारत-बांगलादेश यांच्या सीमेवर असलेला बंगालमधील जिल्हा आहे आणि तेथे नेहमीच बाँब सापडण्याच्या घटना समोर येत असतात. गेल्या वर्षी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने याच जिल्ह्यातून अल् कायदाच्या ६ आतंकवाद्यांना अटक केली होती. त्यानंतरही काही आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती.