शांत, नम्र आणि साधनेची तळमळ असलेली मैसुरू (कर्नाटक) येथील कु. स्वास्ती मारुति पेटकर (वय १६ वर्षे) !

मैसुरू, कर्नाटक येथील कु. स्वास्ती पेटकर हिची ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. राधा मंजुनाथ (आजी, आईची आई) आणि सौ. दीपा औंधकर (मावस मावशी, कु. स्वास्तीच्या आईची मावस बहीण) यांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. स्वास्ती पेटकर

सौ. राधा मंजुनाथ (आजी, आईची आई) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मैसुरू

सौ. राधा मंजुनाथ

१. शांत आणि नम्र

‘स्वास्ती जन्मतःच शांत आहे. ती प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाते. ती घरातील सर्वांशीच आदराने वागते.

२. व्यवस्थितपणा

अ. ती प्रत्येक कृती नीटनेटकी करते. ती पुष्कळ शिस्तप्रिय आहे.

आ. ती शाळेत शिकत असतांना तिला हुशार आणि शांत मुलगी म्हणून ओळखायचे. तिचे हस्ताक्षर पाहून आमचा भाव जागृत होतो. शाळेतील शिक्षकांनाही स्वास्तीचे अक्षर, वह्या व्यवस्थित ठेवणे, तिचे रहाणीमान आणि शाळेचा अभ्यास करण्याची पद्धत, या सर्व गोष्टी आवडत होत्या.

३. सात्त्विक विचारसरणी

अ. स्वास्तीने मागील काही दिवसांपासून मांसाहार खाणे बंद केले आहे. ‘मुक्या प्राण्यांना मारून खाणे अयोग्य आहे’, असे तिला वाटते.

४. सात्त्विकतेची ओढ

ती देवपूजा करणे, आरती म्हणणे, रांगोळी काढणे, सणाच्या दिवशी दाराला तोरण लावणे इत्यादी गोष्टी भावपूर्ण करते.

५. साधनेची तळमळ

कु. अपाला औंधकर

५ अ. स्वभावदोष आणि अहं यांचे सारणी लिखाण करणे आणि त्यांवर मात करण्यासाठी शिक्षापद्धत अवलंबणे अन् व्यष्टी साधनेचा आढावा देणे : स्वास्तीमध्ये साधनेची तळमळ आहे. भाववृद्धी सत्संगात सत्संग घेणारी साधिका गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) सांगत असतांना तिचा भाव जागृत होतो. ‘तिने माझ्या बहिणीची (सौ. सुजाता रेणके यांची) नात कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिच्याकडून ‘व्यष्टी साधनेचा आढावा कसा द्यायचा ?’, हे समजून घेतले. मी मैसुरूमध्ये असतांना (सध्या सौ. राधा मंगळुरू आश्रमात पूर्णवेळ साधना करतात.) ती मला प्रतिदिन न चुकता व्यष्टी साधनेचा आढावा देत असे. याआधी स्वास्ती अपालाला प्रत्येक रविवारी भ्रमणभाष करून आढावा देत असे. स्वास्तीने अपालाकडून साधनेविषयी अनेक सूत्रे समजून घेतली आणि आता स्वास्ती त्यानुसार कृती करत आहे, उदा. स्वभावदोष आणि अहं यांचे निरीक्षण करून सारणी लिखाण करणे, स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी शिक्षापद्धत अवलंबणे इत्यादी.

५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित साधनेचे प्रयत्न करण्याची स्वास्तीला तळमळ वाटणे : अपाला रामनाथी आश्रमात रहायला गेल्यानंतर ‘तिचा प्रत्येक आठवड्याला सत्संग मिळणार नाही’, याचे स्वास्तीला पुष्कळ वाईट वाटले. ‘आता माझ्याकडून साधनेचे प्रयत्न कसे होणार ?’, याची तिला काळजी वाटली. नंतर ‘मी साधनेत अजून कसे प्रयत्न करू ? मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे प्रयत्न कसे करू ?’, असे ती मला विचारत होती.

५ इ. साधना सत्संगात उपस्थित रहाणे : मी तिला ‘यू ट्यूब’वरील प्रतिदिन चालू असलेले ‘साधना सत्संग’ ऐकायला सांगितले. आता ती महाविद्यालयातील अभ्यास, घरकाम यांसह नामजपादी उपाय आणि स्वभावदोष अन् अहं यांचे सारणी लिखाण या गोष्टी गांभीर्याने करते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ती प्रतिवर्षी घराची सजावट करते. ती ‘परात्पर गुरु डॉक्टर घरी येणार आहेत’, असा भाव ठेवते. तिला त्यासंदर्भात अनुभूतीही आल्या आहेत.

७. स्वास्तीमध्ये जाणवलेले स्वभावदोष

भित्रेपणा आणि निर्णयक्षमतेचा अभाव

‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने मला स्वास्तीची गुणवैशिष्ट्ये लिहिता आली’, याबद्दल मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’ (२३.१०.२०२१)

सौ. दीपा औंधकर (मावस मावशी, स्वास्तीच्या आईची मावस बहीण), रत्नागिरी

सौ. दीपा औंधकर

१. शांत

‘कु. स्वास्ती अनावश्यक बोलत नाही. तिला दंगामस्ती आवडत नाही. ती लहानपणापासून शांतपणे खेळते.

२. विचारण्याची आणि ऐकण्याची वृत्ती

ती प्रत्येक गोष्ट विचारून करते. तिचा प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असतो.

३. साधनेच्या स्तरावर दृष्टीकोन देणे

घरातील काही प्रसंगांत काही जणांची चिडचिड होत असल्यास स्वास्ती त्यांना योग्य दृष्टीकोन देते. त्या वेळी संबंधित व्यक्ती स्वास्तीचे शांतपणे ऐकते.

४. शिकण्याची वृत्ती

स्वास्ती नेहमी इतरांचे गुण पहाते. एखाद्या वेळी तिचे इतरांच्या स्वभावदोषांकडे लक्ष गेल्यास त्याची तिला लगेच जाणीव होऊन ती गुरुदेवांचे स्मरण करते. ती सतत शिकण्याच्या स्थितीत रहाते.

५. साधनेची तळमळ

ती व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी अपालाचे (माझ्या मुलीचे, कु. अपाला औंधकर हिचे) साहाय्य घेते. ती अपालापेक्षा मोठी असूनही तिला यात न्यूनता वाटत नाही.

६. भाव

एकदा ती अपालाला भ्रमणभाषवर भावजागृतीविषयी विचारत असतांना अपालाने तिला भावजागृतीसाठी प्रयोग करायला सांगितला. तेव्हा स्वास्तीने प्रथम नकार दिला; पण नंतर सकारात्मक राहून भावजागृतीचा प्रयोग केला. तिला मराठी भाषेत व्यवस्थित बोलता येत नसूनही तिने चांगल्या प्रकारे भावजागृतीचा प्रयोग सांगितला. ती सांगत असलेला भावजागृतीचा प्रयोग ऐकत असतांना माझी भावजागृती झाली.

‘हे गुरुदेवा, कु. स्वास्तीची ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढू दे आणि तुम्हाला अपेक्षित अशी तिची साधना होऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’ (२३.१०.२०२१)

मैसुरू (कर्नाटक) येथील कु. स्वास्ती मारुति पेटकर (वय १६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

१. डोके दुखू लागल्यावर ‘ऑनलाईन’ वर्गाला उपस्थित रहाता येणार नाही’, असे वाटणे, मोरपिसाने देहावरील आवरण काढल्यावर हलकेपणा अन् उत्साह जाणवून ‘ऑनलाईन’ वर्गाला उपस्थित राहू शकणे : ‘सामान्यतः मला डोकेदुखी चालू झाल्यावर माझी चिडचिड होणे, कंटाळा येणे आणि ‘काहीच न करता नुसते बसून रहावे’, असे मला वाटते. एकदा माझे डोके दुखू लागल्यावर ‘ऑनलाईन’ वर्गाला उपस्थित रहाता येणार नाही’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी माझ्या शरिरावरील आवरण काढण्याची वेळ झाल्याने मी मोरपिसाने माझ्या देहावरील आवरण काढू लागले. त्या वेळी ‘माझ्यावरील ओझे दूर होत आहे’, असे मला जाणवू लागले. त्यानंतर मला पुष्कळ हलकेपणा आणि उत्साह जाणवला अन् मी ‘ऑनलाईन’वर्गाला उपस्थित राहू शकले. या अनुभूतीसाठी मला ईश्वराप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. एकाग्रतेने नामजप करत असतांना ‘दत्तगुरु शंख वाजवत आहेत’, असे दृश्य दिसणे आणि शंखनाद ऐकू येणे : १८.७.२०२० या दिवशी मी अभ्यास न करता नामजप करायला बसले. एरव्ही मी अभ्यास पूर्ण करूनच नामजप करते. या दिवशी संपूर्ण एकाग्रतेने नामजप करत असतांना मला ‘दत्तगुरु शंख वाजवत आहेत’, असे दृश्य दिसले आणि मला तसा शंखनादही ऐकू आला.

देवाच्या कृपेने आलेल्या या सुंदर अनुभूतीसाठी मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. स्वास्ती मारुति पेटकर (वय १६ वर्षे), मैैसुरू, कर्नाटक. (२५.७.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक