मध्यंतरी नाशिक येथील एका श्रीमंत सराफ व्यावसायिकांची मुलगी रसिका हिचा विवाह मुसलमान युवक आसिफ याच्याशी झाला. ‘हा विवाह लव्ह जिहाद आहे किंवा नाही’ हे कालांतराने कळेल; तरीही या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा विषय चर्चेत आला. ‘लव्ह जिहाद’ या विषयाची व्याप्ती आणि विविध पैलू लक्षात आणून देणारी ही लेखमालिका ‘असे विवाह म्हणजे एकप्रकारे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न कसा आहे ?’, हे लक्षात आणून देईल !
मागील भागात आपण हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून कसा विरोध होतो अन् हिंदु मुलगी आणि मुसलमान प्रतिष्ठित यांचा विवाह मात्र कसा बिनविरोध होतो, हे सूत्र पाहिले. आज त्यापुढील सूत्रे पाहू.
(भाग ५)
भाग ४. ‘हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून सर्वत्र होणारा विरोध आणि समाजातील मुसलमान प्रतिष्ठितांचा हिंदु मुलींशी निकाह मात्र बिनविरोध !’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/543843.html
लेखक – शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ
भिन्न धर्मियांचा विवाह म्हणजे केवळ धर्मांतरच नव्हे, तर पुढचे राष्ट्रांतर !
लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु स्त्रिया असोत की, बलपूर्वक किंवा आमिषाला बळी पडून धर्मांतरित झालेले हिंदु पुरुष असोत, कित्येकदा त्यांच्या झालेल्या धर्मांतराची परिणती राष्ट्रांतराच्या दिशेने जाते. लव्ह जिहादच्या माध्यमातून एकप्रकारे धर्मांतर होत असल्याने ते घातक ठरते, हे लक्षात घेतले पाहिजे. वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.’ दुर्दैवाने हे धर्मांतरीत हिंदु अधिक कट्टर हिंदुद्वेष्टे झाल्याचे चित्र दिसते; किंबहुना त्यांचे धर्मांतरामुळे राष्ट्रांतरही झाल्याचे आढळून येते. पुष्कळ पूर्वीची उदाहरणे न पहाता १९ आणि २० व्या शतकातील काही मोजकी उदाहरणे पाहिली, तरी या विधानाची निश्चिती होईल.
धर्मांतरित झालेल्या अब्दुल्ला घराण्याच्या नेत्यांची काश्मीरमधील हिंदूंच्या वंशसंहाराला मूकसंमती असणे
काश्मीरच्या शेख अब्दुल्लाचे पूर्वज हिंदूच होते. त्यांच्या पूर्वजाचे नाव राघवराम कौल; पण काश्मीरमधील मुसलमान राजवटीत त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. ‘आज त्यांचे वंशज माजी मुख्यमंत्री फारूक, त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला भारताशी एकनिष्ठ आहेत’, असे म्हणता येईल का ? अब्दुल्ला घराण्याचे पाकिस्तानविषयीचे प्रेम अनेकदा दिसून आले आहे. फारूक अब्दुल्ला वर्ष १९९० मध्ये काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना तिथे हिंदूंचा अमानवीय संहार झाला, स्त्रियांवर अमानुष बलात्कार झाले, ५ लाख हिंदूंना काश्मीरमधून पलायन करावे लागले. अब्दुल्ला घराण्याचे पूर्वज हिंदु असूनही त्यांच्यापैकी कुणीही तो भीषण नरसंहार रोखू शकले नाहीत; जणू त्यांची त्या नरसंहाराला मूकसंमतीच होती. याचाच अर्थ ते भारतद्वेषी आणि पाकधार्जिणे असल्याप्रमाणेच वागले.
भाग्यनगरातील (हैद्राबाद) गोशामहल विधानसभा क्षेत्राचे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या मते असदुद्दीन ओवैसी यांचेही पूर्वज हिंदूच होते. निजामाच्या कार्यकाळात त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला. आज त्यांचे असदुद्दीन आणि अकबरुद्दीन ओवैसी हे वंशज कट्टर हिंदुद्वेष्टे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही भावांच्या तोंडी नेहमीच हिंदूंच्या संहाराची भाषा असते. या दोघांच्या भारतावरील निष्ठा संशयास्पद आहेत.
धार्मिक हिंदु आजोबा असणार्या जीना यांचे धर्मांतरानंतर राष्ट्रांतर होणे
भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणार्या पापाचे जनक महंमद अली जीना यांचे पूर्वजसुद्धा हिंदूच होते. गुजरातमधील प्रसिद्ध व्यापारी जीनाभाई पूंजा आणि पत्नी मिठीबाई यांच्या ७ अपत्यांपैकी महंमद अली हे ज्येष्ठ अपत्य. १९ व्या शतकापर्यंत जीनांचे आजोबा प्रेमजीभाई मेघजी ठक्कर हे धार्मिक हिंदु होते; पण जुनागडच्या नबाबाच्या मुसलमान राजवटीत त्यांचेही बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. या धर्मांतरामुळे त्यांच्या वंशजांचे राष्ट्रांतरही झाले ! प्रेमजीभाईंचे नातू महंमद अली जीना यांनी वर्ष १९४७ मध्ये भारताच्या भाळी पाकिस्तानच्या रूपाने कायम भळभळत रहाणारा घाव निर्माण केला. गेल्या ७५ वर्षांपासून हा घाव असह्य वेदना देत आहे. पुढील काळात हा घाव भारतमातेला अजून किती वेदना देईल, हे सांगता येत नाही.
आज सर्वांसाठी डोकेदुखी ठरलेले मशिदींवर ध्वनीवर्धक बसवण्यास अनुमती देणारे बॅ. अंतुले मूळ करंदीकर घराण्यातील !
एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले बॅ. अब्दुल रहमान अंतुले यांनी एकदा त्यांचे पूर्वज ‘कोकणातील करंदीकर घराण्यातील होते’, हे मान्य केले होते; पण त्यांच्या काळात त्यांनी अनेक गोष्टींत मुसलमान समाजाला झुकते माप दिले होते. त्यांच्याच कार्यकाळात अजान पढण्यासाठी मशिदींवर ध्वनीवर्धक बसवण्याची अनुमती (परवानगी) देण्यात आली. आज प्रत्येक गावातील सर्वच मशिदींवरून एकाच वेळी दिवसातून ५ वेळा कर्णकर्कश आवाजात अजानची बांग देण्यात येते. त्या वेळेस बाहेरील पटांगणात हिंदूंचे जाहीर प्रवचन, कीर्तन इत्यादी चालू असेल, तर अजान होईपर्यंत थांबवावे लागते; कारण अजानच्या कर्कश आवाजामुळे वक्त्याचे बोलणे श्रोत्यांना काहीच ऐकू येत नाही. अनेक मुसलमान राष्ट्रांतसुद्धा ध्वनीवर्धकावरून अजानची बांग देण्यास बंदी आहे. भारतातील काही न्यायालयांनीही त्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत; पण त्याची कार्यवाही होत नाही. अंतुले यांच्या मुसलमान समाजाच्या तुष्टीकरणामुळे अन्य समाजाला कितीही त्रास झाला, कितीही मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाले, तरी ते आता सहन करणे भाग आहे.
पाकिस्तानच्या निर्मितीची कल्पना प्रथम मांडणारे महंमद इक्बाल यांचे पूर्वजही मूळ काश्मीरमधील सप्रू घराण्यातील
‘मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेश असावा’, ही कल्पना डोक्यात सर्वांत प्रथम निर्माण झालेले आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताची रचना करणारे महंमद इक्बाल हेही पूर्वीचे हिंदूच. त्यांचे पूर्वज सप्रू आडनाव असणारे काश्मिरी ब्राह्मण होते; पण त्यांचे पूर्वज धर्मांतरित होऊन त्यांनी इस्लाम स्वीकारला. इक्बाल यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमधील सियालकोट येथे वर्ष १८७७ मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू फाळणीपूर्वीच म्हणजे वर्ष १९३८ मध्ये झाला; पण इक्बाल वर्ष १९३० मध्ये ‘मुस्लिम लीग’चे अध्यक्ष असतांना त्यांनी मुसलमानांसाठी ब्रिटीश साम्राज्यांतर्गत अशा स्वायत्त प्रदेशाची मागणी केली होती. पुढे याच मागणीचे रूपांतर मुसलमानांसाठी स्वतंत्र देशाच्या मागणीत होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पूर्वी (कथित) भारतभक्त असणारे इक्बाल धर्मांतरानंतर पक्के पाकिस्तानभक्त झाले.
—————
हे पण वाचा –
♦ ‘लव जिहाद’ रोकनेके उपाय तथा हिन्दू समाजको आवाहन
♦ लव जिहाद : हिन्दू युवतियों, स्त्रियों तथा अभिभावकों के लिए ध्यान में रखनेयोग्य सावधानियां
♦ लव जिहाद : हिन्दू युवतियो, झूठे प्रेमकी बलि चढकर आत्मघात न करो !
♦ ‘लव जिहाद’का प्रसार तेजीसे होनेके कुछ कारण
हे चारही लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.hindujagruti.org/hindi/hindu-issues/love-jihad
—————————————–
ब्राह्मण पूर्वज असलेल्या आणि नंतर मुसलमान झालेल्यांनी काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावले
खरेतर काश्मीरमधील आजचे बहुतांश मुसलमान हे पूर्वीचे हिंदूच होते. पी.डी.पी.चे आमदार दिलावर मीर यांनी तर एकदा ‘आपले पूर्वज सारस्वत ब्राह्मण होते’, असे मान्य केले होते; पण धर्मांतर करून मुसलमान झालेल्यांनीच काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात पुढाकार घेतला; कारण धर्मांतरामुळे त्यांचे राष्ट्रांतरही झाले होते ! त्यामुळे ‘लव्ह जिहादच्या प्रकरणांकडे तो केवळ दोन भिन्न धर्मीय प्रेमिकांचा विवाह आहे’, अशा भोळसट दृष्टीने पहाणे हिंदूंसाठी घातक ठरेल !
– शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ